Monday, April 11, 2011

खरच किती बर झाल असत.....

खरच किती बर झाल असत.....

खरच किती बर झाल असत..
जर २४ तास कोणीतरी आपल झाल असत..

खरच किती बर झाल असत..
जर आपल्या दोघांच्या आजू-बाजूला घर असत..

खरच किती बर झाल असत..
जर तुझ्या नावा मागे माझे नाव लागले असत..

खरच किती बर झाल असत..
जर माझ आणि तुझा प्रेम झाल असत..


खरच... खरच किती बर झाल असत.....
जर मी म्हणतो तस झाल असत.....



खरच किती बर झाल असत.....

मी असाच आहे......

मी असाच आहे...... 


मी असाच आहे...... 
एकटा एकटा जगनारा
सर्वात असताना देखील
स्वताच्या शोधात फिरनारा... 


मी असाच आहे...... 
खुप प्रेमाने बोलणारा
आपल्या सरळ वागन्यामागे
कुणालाही सहज आपलसा करणारा... 


मी असाच आहे......
 जीवनाचा मर्म जाननारा
साध्या मैत्रीच्या नात्यालाही
आपला धर्मं माननारा... 


मी असाच आहे...... 
दुखा:तही नेहमी हसणारा
अन हसत हसत
नियतीला लाजवनारा... 


मी असाच आहे...... 
इतरांना सतत प्रकाश वाटणारा
पण स्वत: मात्र
कालोखात आठवनारा...


मी असाच आहे...... 
सगल्यांपासून दूर दूर जाणारा
जाताना मात्र सगल्यांच्या मनात
घर एक करून राहणारा... 
मी असाच आहे......


मी असाच आहे......

जाताना मी म्हणालो.....

जाताना मी म्हणालो.....
घट्ट मिठी मारून जा
स्वप्नातलं आयुष्य मला
आंदण म्हणून देऊन जा.....

मग ती म्हणाली.....
चिंता करू नकोस
जीवनाच्या एका वळणावर,
आपण पुन्हा एकदा भेटूया
स्वप्नातलं संसार आपलं
प्रत्यक्षात घडवूया.....